नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नवा विक्रम
नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नवा विक्रम झाला आहे.
नांदेड : नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नवा विक्रम झाला आहे. एकाच वेळी 1 लाखाहून अधिक नागरिकांनी एकाच वेळी योगासनं केली. या विक्रमाची गोल्डन बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या आधी ९२ हजार लोकांनी एकाच वेळी योगासनं केल्याचा विक्रम होता. योगगुरू बाबा रामदेव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही योगासनं झाली. मुख्यमंत्र्यांनीही अतिशय उत्साहात योगासनं केली.
आंतराष्ट्रीय योग दिन धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे शहरातील पोलीस मुख्यालय मैदानात पाच हजाराहून अधिक योग साधकांनी योगासनं केली. तर जिल्ह्यातील बहुतांश शाळेत विद्यार्थ्यांनी योगाभ्यासाचे धडे घेतले. विशेष म्हणजे यावेळेस रांगोळी काढून एक नाविन्यपूर्ण पद्धतीने हा योग दिन साजरा करण्यात आला.
जागतिक योग दिनानिमित्त जुहू चौपाटीवर स्वामी विवेकानंद युथ कनेक्टच्या वतीनं योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात योगासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी विविध संस्था आणि नागरिकांनी सहभाग नोंदवत योगासनं केली. शाऱीरिक आणि मानसिक दृष्ट्या व्यक्तीला निरोगी ठेवण्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.