World Vada Pav Day : मुंबई असो की पुणे राज्यातील विविध भागात वडापाव हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्रात असा कोणता व्यक्ती नसेल ज्यांने कधी वडापाव खाल्ला नसेल. आज 23 ऑगस्ट हा दिवस वडापाव दिवस म्हणून ओळखला जातो. या वडापावची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. पण वडापाव मात्र कोणताही असो त्याला पाहून तोंडाला पाणी सुटतंच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आपण पुण्याताली काही प्रसिद्ध वडापाव कोणते याबद्दल जाणून घेणार आहोत. वडापाव हा आता फक्त मुंबईपुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण जगात तो प्रसिद्ध झाला आहे.


पुण्यातील वडापाव बद्दल बोलायचे झाले तर सर्वात आधी नाव येते जोशी वडेवाले यांचे. त्यानंतर बनगार्डन आणि इतर आणखी काही वडापाव प्रसिद्ध आहेत.


बुधवार पेठमधील अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर, श्रीकृष्ण वडापाव, एस कुमार वडेवाले
सोमवार पेठमधील गोली वडापाव, 
कसबा पेठेतील कर्जत वडापाव
शिवाजीनगर येथील जंबो किंग,  भारती वडेवाले
ताडीवाला रोड येथील शिव शंकर वडेवाले
पुणे-सातारा रोड वरील दी वडापाव कॅफे


या व्यतिरिक्त देखील पुण्यात अनेक वडापाव आहेत ज्यांच्यापुढे नागरिकांचा मोठी गर्दी दिसते. असा हा वडापाव आज अनेकांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. वडापावची चव ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पाहायला मिळते. त्यामुळे पुणेकर नक्कीच वेगवेगळी टेस्ट घेण्यासाठी या वडापाव सेंटरला भेट देतील.