पुणे : जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. तरुणाची रात्री गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पूर्व वैमनस्यातून हा सर्व प्रकार केल्याचं सांगितलं जातंय. (Wrestler shot dead in Shel Pimpalgaon khed area at Pune district cctv video viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय झालं?


खेडमधील (Khed) शेल पिंपळगावात (Shel Pimpalgaon) मिलिंद बिअर शॉपजवळ गुरुवारी रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी हा प्रकार घडला आहे. पूर्व वैमनस्यातून या तरुणाचा कट रचून काटा काढण्यात आल्याचं म्हंटलं जात आहे. 



या नराधमांनी तरुणाला मारण्याचा कट रचला. तरुणाला मारण्यासाठी 4 अज्ञात तरुण दबा धरुन बसले. त्या ठिकाणी तेवढ्यात गाडी आली. गाडीत तो तरुण होतो. या अज्ञातानी वेळ न दवडता गाडीवर अंधाधुंद गोळीबार केला. 


या गोळीबारात तरुण गंभीर जख्मी झाला. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या तरुणाचं आजूबाजूच्या परिसरात पैलवान असा नावलौकिक होता. 


दरम्यान या सर्व प्रकरणी चाकण पोलीस (Chakan Police) तपास करत आहेत. हा सर्व प्रकार जुन्या वादातून घडला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. आता पोलीस या अज्ञात तरुणांच्या शोधात आहेत.