भावना सूर्यकिरण या अमरावतीत राहणाऱ्या तरुणाच्या खिशात शाओमी रेडमी नोट ४ चा स्फोट झाल्याची घटना नूकतीच घडली. शाओमीकडून याचा तपास करण्यासाठी एक समिती तयार केली त्या समितीने आपला अहवाल दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या घटनेत भावना सुर्यकिरण हे जखमी झाले होते. त्यानंतर देशभरात शाओमी विरुद्ध संतापाची लाट उसळली. शाओमीकडून यासंदर्भात सखोल तपास सुरू आहे. शुक्रवारी कंपनीने आपला प्राथमिक अहवाल दिला. स्मार्टफोनवर बाह्य शक्ती लादली गेल्यानेच कदाचित ही घटना घडली असेल. 
सूर्यकिरण, एक लहान व्यापारी असून तो मोटारसायकलवरून जात असताना ही घटना घडली. त्याने तात्काळ फोन फेकून दिला. २० दिवसांपूर्वी फोन खरेदी केला होता आणि ते नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी तो कोर्टात जाणार असल्याचेही त्याने सांगितले होते.


नुकसानाचे नेमके कारण समजून घेण्यासाठी विस्तृत तपास सुरू आहे.  या डिव्हाइसवर अत्यंत बाह्य शक्ती लागू केली गेली, ज्यामुळे मागील कव्हर आणि बॅटरी चालू झाली आणि पडदा खराब झाल्याने ही घटना घडली असावी असे स्मार्टफोन बनविणाऱ्याने यावेळी सांगितले.


 ग्राहकांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे .आमचे सर्व डिव्हाइसेस उच्च गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कडक गुणवत्ता चाचणीतून जात असल्याचे पुष्टीही त्यांनी दिली. 


 युजर्सना आवाहन


  •  डिव्हाइस उघडणे टाळा

  • बॅटरीला अडथळा येईल असे काही करु नका

  • यंत्रामध्ये जास्त शारीरिक ताकद लावणे टाळा

  • अनधिकृत दुकानांवर स्मार्टफोनची दुरुस्ती करु नका