अमरावती : हाथसर बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करन्याचा प्रयत्न तेथिल राज्य सरकार च्या वतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटूंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो त्या मुळे या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या राज्याकडे सोपवावा अशी मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाथरस बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश वर देशभरातून टीका होत आहे. पिडित कुटूंबाला माहीती न देता त्या तरुणीचा मृतदेह जाळण्यात आला होता. त्यानंतर हाथरसच्या जिल्हाधिकारी यांनी पीडित कुटूंबाला धक्कावल्याचा व्हिडिओ ही समोर आला होता. तसेच माध्यमासोबत बोलन्यास या कुटूंबाला पोलिसांनी नकार दिला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार ला नेमकं काय लपवायच असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हाथरस मध्ये जे काही घडलं ते अतिशय वेदनादायी घडलं. हे सर्व मानवजातीला लज्जास्पद गोस्ट आहे. हा खटला उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवला गेला पाहिजे सुप्रिम कोर्टाने राजधर्माचे पालन केले पाहिजे. या प्रकरनातील पुरावे नष्ट होण्याची श्यक्यता आहे. त्या पीडितेच कुटूंब जिवंत राहल पाहिजे असही यशोमती ठाकूर म्हणाल्या.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण हाथरस प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी करण्याची शिफारस केली आहे.



उल्लेखनीय आहे की मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून शनिवारी अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी आणि डीजीपी हितेशचंद्र अवस्थी हाथरसमधील पीडित कुटुंबास भेटण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला.