यवतमाळ : अनेकदा काही अशा घटना घडतात ज्या पाहून अक्षरश: पायाखालची जमिनही हादरल्याचा भास होतो. अशीच थरकार उडवणारी घटना यवतमाळमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे या घटनेचा व्हिडिओ पाहून त्यावर अनेकांनीच, 'देव तारी त्याला कोण मारी', अशीच प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळच्या पुसद शहरात ही घटना घडली असून, त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. 


सुट्टीच्या दिवसांमध्ये खेळत असताना पतंग आणण्यासाठी म्हणून वर चढलेला स्वप्नील झगरे हा शाळकरी मुलगा तीन मजल्यांच्या इमारतीवरुन खाली पडला. 


पण, आश्चर्यकारकरित्या तो बचावला. पतंग आणण्यासाठी म्हणून इमारतीखाली गेलेल्या त्याच्या मित्राच्याच पाठीवर स्वप्नील इतक्या अलगदपणे पडला, की त्याला साध खरचटलंही नाही. 


इमारतीखाली असणाऱ्या ज्या मुलाच्या अंगावर तो पडला त्याला कोणत्याच प्रकारची दुखापत झाली नाही हेसुद्धा तितकच महत्त्वाचं. अतुल रेवणवार यांच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये ही दृश्यं कैद झाली असून, सध्या हा व्हिडिओ चर्चेत आहे.  


सुट्टीच्या दिवसांमघ्ये खेळाच्या नादात लहान मुलं कशा प्रकारे त्यांचा जीव धोक्यात घालतात याचाच प्रत्यय या व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे. त्याशिवाय पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देण्याची गरज असल्याचा मुद्दाही इथे अधोरेखित होत आहे.