यवतमाळ : कर्जमाफीची घोषणा होवूनही मदत मिळत नाही. तसेच किटकनाशकामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकरी संतप्त झालेत. ते आपला राग आता मंत्र्यांवर काढत आहे. यवतमाळ येथे कृषीमंत्र्यांच्या गाडीवर कापसाचे झाड फेकले आणि विरोधात घोषणाबाजी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील शेतकरी  संतप्त झाले आहेत. कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या ताफ्यातील वाहनावर कापसाचे झाड फेकण्यात आले. शेतकऱ्यांची बाजू ऐकून न घेतल्याने शेतकऱ्यांचा पारा चढला आणि मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर कापसाचे झाडच फेकले.


दरम्यान, माणोली येथे शेतकऱ्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांची बाजू ऐकूण घेतली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. यावेळी पालकमंत्री मदन येरावार आणि शेतकरी नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. मदन येरावार आणि कृषी मंत्र्यांविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.