Yawatmal: यवतमाळ शहरात भररस्त्यात तृतीयपंथ्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. कोण असली? कोण नकली तृतीयपंथी? या विषयावरुन हा राडा सुरु होता. ही वाद इतका वाढला की त्यातील काही तृतीयपंथ्यांनी भर रस्त्यात स्वत:चे कपडे उतरवले. वाद पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली. पण वाद करणारे तृतीयपंथी थांबण्याचे नाव घेत नव्हतेय.अ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळच्या रस्त्यावर तृतीयपंथ्यांनी वाद निर्माण करीत भर रस्त्यात चांगलाच हंगामा घातला. जांब चौफुलीवरील हॉटेलमध्ये असलेल्या लग्नसमारंभात तृतीयपंथीयांचा एक गट बधाईची रक्कम गोळा करीत होता. ही माहिती समजताच दुसऱ्या गटाने हॉटेल समोरच त्यांना गाठून बेदम मारहाण सुरू केली. इथून वादाला सुरुवात झाली.


आम्ही असली तृतीयपंथी आहोत आणि ते नकली तृतीयपंथीय असल्याचे दुसऱ्या गटाने सांगितले. त्यानंतर पहिल्या गटातील तृतीयपंथ्यांचे  लांब केसांचे विग काढण्यात आले. भर रस्त्यातच एकमेकांचे कपडे देखील फाडण्यात आले. त्यामुळे याठिकाणी प्रचंड राडा झाला. तसेच याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. 


बराच वेळ दोन गटातील ही धुमश्चक्री सुरू होती, यवतमाळ शहरात गँगवारमधून अनेक गुन्हे घडत असतात. आता तृतीयपंथीयांनी देखील शहरात आपापले क्षेत्र ठरवून चंदा गोळा करणे सुरू केल्याने त्यात आणखी भर पडली आहे.


लिफ्ट कोसळून कामगार ठार


सांगलीच्या मिरजेत लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यु झाला आहे,तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.कुणाल चव्हाण,असे मृत व्यक्तीचे  तर योगेश भंडारे,असे जखमी कामगाराचे नाव आहे.हे दोघे ही शहरातील दर्गा रोडवर असणाऱ्या एका चप्पल दुकानात लिफ्ट दुरुस्ती करत असताना तिसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळून हा अपघात घडला आहे.मृत आणि जखमी कामगार हे कोल्हापूरच्या इचलकरंजी मधले आहेत.लिफ्ट दुरुस्तीसाठी ब्रिजेश फुटवेअर या ठिकाणी आले होते.यावेळी तिसऱ्या मजल्यावर नादुरुस्त लिफ्टचं काम करत असतान अचानकपणे लिफ्ट कोसळली,ज्यामध्ये लिफ्टच्या आत असणारा कुणाल चव्हाण जागीच ठार झाला.