नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी येस बँकेवर निर्बंध ( Yes Bank crisis ) लादल्यानंतर सगळ्या व्यवहारावर बंधने आली आहेत. ग्राहकांना केवळ ५० हजार रुपये काढता येणार आहेत. आता आरबीआयने येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला (Tukadji Maharaj Nagpur University) बसण्याची शक्यता आहे. विद्यापीठाचे कित्येत कोटी रुपये अडकले आहेत. विद्यापीठाच्या येस बँकेमध्ये १९१ कोटींच्या ठेवी असल्याची माहिती सामोर आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचा पर्याय असताना खासगी बँकेत इतक्या ठेवी ठेवल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शुक्रवारी यासंदर्भात सिनेटची बैठक झाली. दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यापीठाने पैसा का ठेवला नाही, असा सवाल अॅड. मनमोहन वाजपेयी यांनी उपस्थित केला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे येस बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. ग्राहकांना येस बँकेच्या अकाऊंटमधून ५० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढता येत नसल्याचे घाबरले आहेत. अनेकांना आपल्या कर्जाचे हप्ते भरण्यासही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्या संकटात सापडले आहेत.  


दरम्यान, आता नवनविन माहिती पुढे येत आहे. येस बँकेत जगन्नाथ मंदिराचे ५९५ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामध्ये ५४५ कोटी रूपये ठेवी ठेवल्या आहेत. त्यामुळे हे पैसेही अडकले आहेत. यामुळे मंदिर पुजारी आणि भक्त चिंतेत आहेत. शुक्रवारी ओडिशा सरकारच्या नेत्यांनी मंदिरासंबंधीतच्या ठेवीबाबत दुजोरा दिला आहे. त्यानंतर विरोधीने यासंदर्भात ओडिशा सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे. 


0