जालना : योगगुरु रामदेव बाबा यांनी फुलांची आणि कोरड्या रंगांची उधळण करून होळी साजरी केली. जालना शहरात रामदेव बाबांचं योग शिबिर पार पडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे शिबीर संपल्यानंतर शिबिरात सहभागी झालेल्या नागरीकांसोबत रामदेव बाबांनी होळी साजरी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शिबिरात सहभागी होत होळी साजरी केली. 


तीन दिवस जालना शहर आणि जिल्ह्यात रामदेव बाबांचे योगा शिबिर पार पडले. या शिबिरांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.