Virar News : मृत्यू कोणाला कुठे गाठेल याचा काही नेम नाही.  स्वप्नातही वाटलं नव्हत असं काही तरी एका तरुणीसह घडलं आहे.  झोपेतचं तिला मृत्यूने गाठले आहे. बेडरूमच्या छताचा स्लॅब अंगावर पडल्याने तरुणीचा मृत्यू झाला आहे. विरारमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरारमध्ये बेडरूम मधील छताचा स्लॅप अंगावर पडल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विरार पूर्व मनवेलपाडा रॉयल पब्लिक स्कूल जवळ, सी एम नंगर येथे असलेल्या दादू प्लाझा इमारतीतील ही घटना आहे. रूम नंबर १०२ मध्ये राहणाऱ्या शितल शिवाजी पवार (वय ३४) ही तरुणी एक नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास घरात बेडरूममध्ये झोपलेली असताना बेडरूमच्या छताचा स्लॅबचा काही भाग तिच्या अंगावर कोसळून ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला तात्काळ विरार पूर्व चंदनसार येथील श्री जीवदानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.तेथे उपचारादरम्यान शितल हिचा मृत्यू झाला. 


या प्रकरणी तिचे नातेवाईक अमित सोलंकी यांनी बुधवारी विरार पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर दादू प्लाझा ही इमारत दहा वर्षे जुनी असल्याची माहिती समोर येत आहे.


शाळेत खेळताना मैदाना लगत असलेल्या खड्ड्यात पडून विद्यार्थाचा मृत्यू


शाळेत खेळताना मैदाना लगत असलेल्या खड्ड्यात पडून विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरमध्ये घडली आहे.  सारंग नागपुरे असे मृत विद्यार्थाचे नाव आहे.  नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील आष्टी येथील भारतीय विद्या भवन या शाळेत ही घटना घडली आहे. खड्ड्यात पडलेला मुलगा बाहेर करण्याचा प्रयत्न करत असताना त्यावेळी तो जखमी आणि दुखापतग्रस्त झाला. त्याला उपचाराकरता रुग्णालयात नेले मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.