पुण्याची ही तरुणी आहे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे आर्या तावरे
Aarya Tawre : पुण्याच्या या तरुणीची सध्या चर्चा आहे. कोण आहे ही तरुणी. वाचा
पुणे : जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने (Forbes Magazine) जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत मूळची बारामतीची असलेली आर्या तावरे (Arya Taware) हिला देखील स्थान देण्यात आलं आहे. फोर्ब्ज आर्थिक बाबींविषयक मासिकात युरोपमधील तीस वर्षांखालील पहिल्या 30 प्रभावी व्यक्तींमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे.
बारामतीकर असलेली आर्या तावरे ही सध्या लंडनमध्ये राहते. आर्या तावरे हिने पुण्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली. आर्याला लॉन टेनिस खेळायला आवडते. तसेच ती प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कल्याण तावरे यांची मुलगी आहे.
कल्याण तावरे यांचे महाराष्ट्रभरात व्यवसाय आहे. आर्या तावरे हिने लंडन विद्यापीठात अर्बन प्लॅनिंग अँड रिअल इस्टेट अँड फायनान्समध्ये शिक्षण घेतलं, त्यानंतर तिने येथील बांधकाम व्यावसायिकांना निधी उभारणीसाठी ज्या अडचणी येत होत्या त्याचा अभ्यास करुन स्वताःची स्टार्ट अप कंपनी सुरु केली.
नवीन उद्योजकांना सुरुवातीला अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्यांची अडचण दूर करण्यासाठी तिने काम करण्यास सुरुवात केली. क्राऊड फंडींग नावाची नवी संकल्पना तिने मांडली आणि ती यशस्वी झाली.
फ्यूचरब्रीक नावाची कंपनी तिने सुरु केली. ज्यामुळे बांधकाम व्यवसायातील लोकांच्या अडचणी दूर झाल्या. आज अनेक ब्रिटीश व्यक्ती तिच्यासाठी काम करत आहेत. याआधी ब्रिटिश सरकारकडून तिला पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे.