मुंबई : येत्या १४ तारखेला होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलल्यानं पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. अनेक मुलं रस्त्यावर उतरली आहेत. शहरातील शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवला आहे. एमपीएससीसाठी 2 लाख 63 हजार मुलं परीक्षेला बसली आहेत. 200 जागांसाठी या परीक्षा होत आहे. 3 दिवस आधी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी संतापले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचं युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी निषेध केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे. असं ट्विट त्यांनी केलं आहे.



झी२४तासला दिलेल्या प्रतिक्रियेत सत्यजित तांबे यांनी म्हटलं की, 'याबाबत ते राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बोलतील. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत देखील चर्चा करु.'