कडकनाथ पालनमध्ये फसवणूक झालेल्य़ा तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात फसवणूक झालेल्या तरुण शेतकऱ्यांना विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
कोल्हापूर : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात फसवणूक झालेल्या तरुण शेतकऱ्यांना विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही आत्महत्या झाली आहे. प्रमोद जमदाडे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात त्याने पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. प्रमोद जमदाडे हा पन्हाळा तालुक्यातील माले इथला रहिवासी आहे.
कोंबडी पालन व्यवसायात फसवणूक झालेल्या दिवसापासून व्यथित होता. प्रमोद जमदाडे याच्या आत्महत्येप्रकरणी सागर खोत याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केलेल्या तरुणांनी केली आहे.