पुणे : शेताच्या राखणीला निघालेल्या एका युवा शेतकऱ्याच्या डोक्यात वार करून खून केल्याची घटना इंदापूर तालुक्यात घडली. या खुनाचा तपास तातडीनं लावावा यासाठी श्वानपथकाची मागणी केली असून तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा निर्णय नातेवाईकांनी घेतला आहे.  


रक्ताच्या थारोळ्यात गाडीवर अर्ध शरीर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोहर म्हस्के या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात गाडीवर अर्ध शरीर असलेल्या स्थितीत पडून होता. गावात हे वृत्त पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. जोपर्यंत श्वान पथक घटनेचा तपास करत नाही, तोपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.


घटनेने परिसरात घबराट


दरम्यान पोलीस तपासासाठी आले तेव्हा गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती, या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. मनोहर म्हस्के याचा कुणी आणि कशासाठी खून केला असेल याचा तपास पोलीस करत आहेत.