टिटवाळा : टिटवाळ्यातील चिंचपाडा-नालंबी नगर गाव रस्त्यावर रात्री एका युवकाची गोळी मारुन हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याच्या प्रेयसीवरही बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


लूटमार करण्याच्या उद्देशानं गोळीबार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा तरुण आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर बसून गप्पा मारत होता. त्यावेळी एका अज्ञात युवकांनं लूटमार करण्याच्या उद्देशानं त्याला गाठलं.. बंदूकीचा धाक दाखवत त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याला विरोध केल्यामुळे तरुणावर गोळीबार केला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीनं तरुणासोबतच्या मुलीवर बलात्कार केला.


अंबरनाथ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल 


पीडित मुलीनं ग्रामस्थांच्या मदतीनं पोलीसांत तक्रार केली. त्यानंतर अंबरनाथ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला... हा परीसर रात्री सुनसान असतो.. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी लूटमारीचे प्रकार अनेकदा होतात.