Yugendra Pawar vs Jay Pawar :  चुलत्या पुतण्यानंतर आता बारामतीत (Baramati) दोन भावांचे राजकारण पहायला मिळणार आहे.  बारामतीमध्ये युवा नेते जय पवार आणि युगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात एकत्र आले. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून युगेंद्र पवार (Yugendra Pawar) तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार (Jay Pawar) राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्हेरी इथे जय पवार यांनी भव्य मातीतील कुस्त्यांची दंगल आयोजित केली होती. या प्रसंगी जय पवार आणि युगेंद्र पवार यांनी एकत्र येत गळाभेट घेतली. दोघांनी मानाची गदा एकत्र उंचावली. तसंच कुस्ती बघण्याचा आनंदही दोघांनी एकत्र घेतला. जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कनिष्ठ पुत्र आहेत. तर युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे राजकारणाच्या आखाड्यात हे दोन्ही युवा नेते उतरणार असल्याची चर्चा आहे. 


बारामतीत भिडणार नवी पिढी? 


बारामती विधानसभा मतदारसंघात पवारांची नवी पिढी एकमेकांविरोधात उभी ठाकण्याची शक्यता आहे.. बारामती विधानसभेत अजित पवार विरुद्द युगेंद्र पवार अशी काका-पुतण्यात लढत होणार अशी चर्चा रंगलेली असतानाच अजितदादांचा मुलगा जय पवार यांचं नाव समोर आलंय.. बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार उमेदवार असण्याची शक्यता निर्माण झालीय. स्वतः अजित पवार यांनीच तसे संकेत दिलेत. 


युगेंद्र पवार आणि जय पवार दोघांचाही बारामती मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. जय पवार अजित पवार यांचे पूत्र आहेत. ते उच्चशिक्षित आहेत.  सध्या सहकारी किंवा खागजी संस्थेवर कोणत्याही पदावर नाहीत. बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांच्या प्रचारात ते सक्रीय होते.  बारामतीत जनता दरबार घेत नागरिकांचे प्रश्नही त्यांनी समजून घेतले होते. युगेंद्र पवार  शरद पवारांचे नातू आहेत. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत.  फलटण तालुक्यातील शरयू खाजगी साखर कारखान्याचं काम ते पाहतात. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत.