पुणे : रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्या वतीने हडपसर येथील अमनोरा टाऊनशीप येथे अध्याय १८ या वार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने झहीर खान आणि युवराज सिंग यावेळी आपल्या मैत्रीचा आणि कारकीर्दीचा प्रवास उलगडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणाला दुखापत झाली आणि काय करावं हे सुचत नसेल तर आम्ही झहीर खानकडे जायचो. कारण तो जे सांगायचा ते योग्य असायचं. त्यामुळे आम्ही त्याला आयडीयावाला बाबा म्हणायचो असं सांगत युवराज सिंगने झहीर खानबाबत सांगितलं. झहीर खानने देखील लग्न, क्रीकेट ते व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबरचे रुम शेअरींगचे किस्से सांगितले.