पुणे : Zee 24 Taas Impact : बातमी 'झी 24 तास' इम्पॅक्टची. जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात गेल्याचे वृत्त 'झी 24 तास' ने प्रसारित केल्यानंतर या वृत्ताची तात्काळ दखल घेण्यात आली आहे. (School Electricity Disconnection) पुणे जिल्ह्यातील 800 शाळांचे थकीत वीजबिल 15 दिवसांत भरणार, अशी माहिती शिक्षण समिती अध्यक्ष रणजित शिवतारे यांनी दिली. (Zee 24 Taas Impact - Pune Zilla Parishad will pay overdue electricity bills of 800 schools in 15 days)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पुण्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल 800 शाळांची वीज कापल्याची बातमी दाखवण्यात आली होती. या बातमीची दखल जिल्हा परिषदेकडून घेण्यात आली आहे. अडीच कोटींचे थकीत लाईट बिल पुढील पंधरा दिवसात जिल्हा परिषद भरणार असल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष रणजित शिवतारे यांनी दिली.



पुणे जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात गेल्या आहेत. वीजबील न भरल्याने जिल्हा परिषदेच्या या शाळांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे (Electricity disconnection of 800 schools )


तब्बल 128 शाळांचे मीटर काढून टाकण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 639 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी 2847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत आहे. मात्र, जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात आहेत. शाळांचे वीजबिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिल न भरल्याने 792 शाळांची वीजजोडणी तोडली आहे. तर तब्बल 128 शाळांचे मीटर (School Electricity Meter) काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळा अंधारात आहेत.