अमोल पाटील, झी मीडिया, खोपोली : डोंगरावरुन कोसळणारा हा फेसाळणारा धबधबा... आजूबाजूला निसर्गानं मुक्तपणे उधळण केलेली हिरवाई... हे सारं काही कुणालाही मोहून टाकणारं.. त्यामुळंच की काय पावसाळा सुरु होताच कुणाचीही पावलं आपसुकच या परिसराकडे वळतात.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटकांना प्रेमात पाडणारा हा आहे रायगडच्या खोपोलीचा झेनिथ धबधबा.. या धबधब्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी आणि सृष्टी सौदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी विकेंडला तर इथं पर्यटकांची झुंबड उडते.. पर्यटक सामान्य असो किंवा मग एखादा सेलिब्रिटी हा झेनिथ धबधबा प्रत्येकावर मोहिनी घालतो.. 


काहीही असलं तरी पर्यटक विकेंडला झेनिथ धबधब्यावर मोठ्या संख्येनं हजेरी लावतात.. धम्माल मस्ती करतात... मात्र धबधब्याचे तुषार अंगावर झेलताना प्रेक्षकहो कुठे अपघात होणार नाही ना याची काळजी मात्र जरुर घ्या.