मयुर निकम , झी मीडिया , बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत असलेले  सहाय्यक शिक्षक डॉ शिवाजी देशमुख यांची अत्यंत महत्वपूर्ण अशा फुलब्राईट फेलोशिप अमेरिकासाठी निवड झाली आहे.  डॉ. शिवाजी देशमुख ०७ जानेवारी ते १४ मे २०२० पर्यंत इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेनेसिल्व्हीयाना, अमेरिका येथे  ते शैक्षणिक संशोधन करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध शाळा भेटी आणि सेमिनारमध्ये अमेरिकेन शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे उद्बोधन तसेच विविध शहरांमध्ये भारताचे सांस्कृतिक राजदुत म्हणून ते अमेरिकेन समुदायासोबत संवाद साधणार आहेत.


यूसीईफ (USIEF)  United States Indian Education Foundation, अमेरिका आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने कृषी, प्रशासन,पर्यावरण, संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना फुलब्राईट फेलोशिप फुलब्राईट स्कॉलरचा दर्जा दिला जातो.


या वर्षी भारतीय शिक्षण क्षेत्रातील ५ व्यक्तींना फुलब्राईट फेलोशिप मिळाली आहे. त्यांपैकी महाराष्ट्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील डॉ. शिवाजी देशमुख एकमेव फुलब्राईट स्कॉलर आहेत.