औरंगाबाद: कचरा समस्येवर औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या सगळ्याच याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरु आहे. कचरा आणि त्याच्या विल्हेवाटीबाबत सध्या नक्की सध्या काय परिस्थिती आहे, याची माहिती दोन आठवड्यात देण्याचे आदेश खंडपीठाने दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज किती कचरा उचलला जातोय, किती गाड्या कामी लावल्यात याचीही विचारणा खंडपीठाने यावेळी केली. शहरात खड्ड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ४८४ कंपोस्ट पीट करण्यात आले होते. 


मात्र, त्यातून पाण्याचे स्त्रोत खराब झाल्याचे पुढे आले. त्यामुळे यावर किती कंपोस्ट पीट कार्यरत आहेत आणि किती ठिकाणी पाण्याचे स्त्रोत खराब झालेत, याची विचारणा खंडपीठाने केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. पालिका आयुक्तांनीसुद्धा याप्रकाराची तातडीने दखल घ्यावी असे खंडपीठाने सांगितलंय. येत्या १५ दिवसांत याबाबतची सविस्तर माहिती खंडपीठात देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.