COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : अंबादास दानवे यांनी आंदोलनकर्त्याला लाथ मारल्याचा आरोप करण्यात येत आहे. औरंगाबादयेथील क्रांती मोर्चा दरम्यान हा प्रसंग घडला. संभाजीनगरातून हे आंदोलन सुरू झालंय मी सुरूवातीपासून आंदोलनाचा कार्यकर्ता आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी खालच्या पातळीवर भाष्य केल्याने मी त्याच्या अंगावर धावून गेलोय असे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.  माझ्याच काय कोणाच्याही नेत्याबद्दल खालच्या भाषेत बोलणे हे त्याच्या कार्यकर्त्याला कधीच आवडणार नाही.  त्या संबंधित कार्यकर्त्याच बोलण खालच्या पातळीवरच होतं. अशा प्रकारची भाषा करणारा मराठा असू शकत नाही असेही त्यांनी सांगितले.


'अंबादास एक्साइड झाले'


त्या ठिकाणी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांविरूद्ध घोषणाबाजी होत होती, त्यामुळे अंबादास दानवे यांनी जास्त एक्साइड होण्याची गरज नव्हती अशी भुमिका मराठा मोर्चातर्फे डॉ. शिवानंद भानुसे यांनी मांडली.