बीड : बीडमध्ये पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अटक केली. या पाच शिक्षकांना जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबित केले आहे. यातील ३ जण जिल्हा परिषदेचे तर दोघे खासगी संस्थेचे शिक्षक आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड शहराजवळ २८ डिसेंबरला पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भाजप जिल्हाध्यांसह ५० जणांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचाही सामावेश असल्याची माहिती समोर येत आली. 


दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा प्रशासनाने या शिक्षकांची माहिती मागवून घेतली होती. त्यानंतर या पाचही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 


निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे


हरिदास घोगरे (नंदनवन कॉलनी, बीड)
भास्कर विठ्ठल जायभाय (रा. पाटोदा)
अशोक रामचंद्र सानप (कालिकानगर बीड)
बंडू किसन काळे (कालिकानगर बीड)
भगवान आश्रुबा पवार(काळेगाव, हवेली)


दरम्यान, जुगार अड्ड्यावर शिक्षकांच्या उपस्थिती प्रकरणामुळे तसेच त्यावरील कारवाईची जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे.