लढाई हा माझ्या जीवनाचा नियम झाला आहे- कंगना रणावत
आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि बिनधास्त अंदाजाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावतचा नवा चित्रपट `सिमरन` लवकरच प्रदर्शित होत आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलर लाँचमध्ये तिने सांगितले की, आजपर्यत मी जे काही मिळवले ते लढवू मिळवले आहे. कंगनाचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणीच नसल्याने तिला अधिक संघर्ष करावा लागला. ज्याबद्दल ती नेहमी बोलत असते.
नवी दिल्ली: आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि बिनधास्त अंदाजाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रणावतचा नवा चित्रपट 'सिमरन" लवकरच प्रदर्शित होत आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलर लाँचमध्ये तिने सांगितले की, आजपर्यत मी जे काही मिळवले ते लढवू मिळवले आहे. कंगनाचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणीच नसल्याने तिला अधिक संघर्ष करावा लागला. ज्याबद्दल ती नेहमी बोलत असते.
सिमरनच्या ट्रेलर लाँचच्या वेळेस ती बोलली:
कंगनाने सिमरनच्या ट्रेलर लाँचच्या वेळेस सांगितले की, आतापर्यंत तिला कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही आणि जे काही मिळवले त्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. कंगना बोलली की, ''माझ्या नशिबात काहीच सहज मिळेल असे लिहिले नाही आहे. मला प्रत्येक गोष्टीसाठी लढावे लागले आहे. आणि मला जे हवे ते मी लढून मिळवते. पुढे तिने सांगितले की, '' लढाई माझ्या आयुष्याचा नियम झाला आहे आणि त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. माझा जो हक्क आहे, तो मी असा नाहीतर तसा पण मिळवतेच.''
१५ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होईल:
'सिमरन' चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहताने केले आहे आणि हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होईल.