पहिल्याच वीकएंडमध्ये `टॉयलेट` चा नवा रेकॉर्ड !
गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला `टॉयलेट: एक प्रेम कथा` या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ५१.४५ करोडचा बिझनेस केला आहे. २०१७ मधील अक्षयची ही दुसरी सुपरहिट फिल्म आहे. याआधी अक्षयचा `जॉली एलएलबी 2` हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. २०१७ मधील सगळ्यात मोठा ओपनिंग वीकएंडमध्ये पहिल्या पाचमध्ये हा चित्रपट आहे. `बाहुबली 2`, `रईस`, `काबिल` आणि `ट्यूबलाईट` नंतर या चित्रपटाचा नंबर आहे.
नवी दिल्ली: गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'टॉयलेट: एक प्रेम कथा' या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ५१.४५ करोडचा बिझनेस केला आहे. २०१७ मधील अक्षयची ही दुसरी सुपरहिट फिल्म आहे. याआधी अक्षयचा 'जॉली एलएलबी 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. २०१७ मधील सगळ्यात मोठा ओपनिंग वीकएंडमध्ये पहिल्या पाचमध्ये हा चित्रपट आहे. 'बाहुबली 2', 'रईस', 'काबिल' आणि 'ट्यूबलाईट' नंतर या चित्रपटाचा नंबर आहे.
तर जाणून घेऊया पहिल्या वीकएंडमध्ये कोणी किती कमाई केली ?
१. बाहुबली:
प्रभासच्या बाहुबली २ ने पहिल्या वीकएंडमध्ये १२८ करोडची कमाई केली होती. या चित्रपटाची बरोबरी अजून कोणत्याही चित्रपटाने केली नाही.
२. रईस:
शाहरुख खानचा 'रईस' हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्या वीकएंडमध्ये ९३.२४ करोडची कमाई केली होती.
३. काबील:
ऋतिक रोशनचा 'काबील' हा चित्रपट शाहरुख खानचा 'रईस' या चित्रपटाबरोबरच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्या वीकएंडमध्ये ६७.४६ करोडचा गल्ला केला होता. या चित्रपटात ऋतिक रोशनने आंधळ्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली होती.
४. ट्यूबलाईट:
२०१७ मध्ये ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'ट्यूबलाईट' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून लोकांच्या अनेक अपेक्षा होत्या. पारू, त्या खऱ्या ठरल्या नसल्या तरी पहिल्या वीकएंडमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली. रिव्ह्यू वाईट असला तर चित्रपटाने ६४.७७ करोडचा गल्ला केला.
५. टॉयलेट एक प्रेम कथा:
टॉयलेट हा चित्रपट ३००० स्किन्सवर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयी लोकांमध्ये कुतुहूल असून पहिल्या वीकएंडमध्ये ५१.४५ करोड कमावले आहेत.