मुंबई : बांधकाम व्यावसायिकांनी महारेराच्या दफ्तरी केलेल्या नोंदणीनुसार ऑगस्ट अखेरीस एकूण 6.7 लाख फ्लॅटचं बांधकाम सुरू होतं. 


52 टक्के फ्लॅट पडून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत 6,70,339 फ्लॅटची महारेराकडे नोंदणी झालेली असतांना, 
यातील 52 टक्के म्हणजेच 3,50,713 फ्लॅट विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. 48 टक्के म्हणजेच 3,19,626 फ्लॅट विकले गेले आहेत.
ग्लोबल प्रॉपर्टी कन्सल्टंट कुशमन अॅंड वेकफील्ड सादर केल्या गेलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 


छोटे फ्लॅट घेण्याकडे कल


बहुतांश खरेदीदार हे 1 आणि 2 बीएचके फ्लॅट घेणारे आहेत. 50 टक्क्यांपेक्षा जास्त फ्लॅट पडून असूनसुद्धा फ्लॅटच्या किंमती मात्र स्थिरच आहेत. मुंबई महानगर परिसरात फ्लॅटच्या चढ्या किंमतींमुळे ग्राहकांचा कल छोटे फ्लॅट घेण्याकडे असतो.


इतरांपेक्षा मुंबई महाग


बेंगालुरू, दिल्ली, पुणे या शहरांशी तुलना करता मुंबईतील घरांच्या किंमती 10-15 टक्के जास्त असल्याचं दिसून आलं आहे. फ्लॅटचा ताबा मिळण्यासाठीही ग्राहकांना बरीच कसरत करावी लागायची. मात्र "महारेरा कायदा" अस्तित्वात आल्यापासून ग्राहकांना दिलासा मिळाला असून बिल्डर्संना वेळेत फ्लॅटचा ताबा द्यावा लागणार आहे.