घोणंस सापाच्या मादीचा ३८ पिल्लांना जन्म
रसल व्हायपर जातीच्या सापाच्या मादीनं ३८ पिल्लांना जन्म दिलाय.
अंबरनाथ : अंबरनाथ मध्ये घोणस अर्थात रसल व्हायपर जातीच्या सापाच्या मादीनं ३८ पिल्लांना जन्म दिलाय.. ए.एम.पी. गेट परिसरात ही घटना घडलीये. अंबरनाथमध्ये रहाणारे सर्पमित्र श्रीकांत गुजर यांच्या घरात घोणस जातीच्या सापानं पिल्लाना जन्म दिला.. रहीवासी भागातून त्यांनी या सापाची सुटका केली होती.. तिच्या वजनावरुन ही मादी साप पिल्लांना जन्म देणार हे त्यांना कळलं त्यामुळे त्यांनी या सापाला प्लास्टीकच्या टबमध्ये ठेवलं होतं.. दरम्यान या सापानं ३८ पिलांना जन्म दिला.. या सापाला पिलांसह पुणे येथील कात्रजच्या सर्पोद्यानात सोपवण्यात येणार आहे.. सापांच्या बहुतांश जाती या अंडे देतात मात्र घोणस जातीचा साप सस्तन प्राण्यांप्रमाणे थेट पिलांना जन्म देतो.. घोणस जातीचा साप हा अत्यंत विषारी आहे.