मुंबईतून तब्बल साडे तेरा किलो एमडी जप्त, दया नायक यांची कारवाई
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी मुंबईतून तब्बल साडे तेरा किलो एमडी जप्त केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी मुंबईतून तब्बल साडे तेरा किलो एमडी जप्त केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या ड्रग्सची किंमत सुमारे पाऊणे तीन कोटीच्या घरात असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
अंधेरीत ड्रग्सचा मोठा पुरवठा
अंधेरीत ड्रग्सचा मोठा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती, दया नायक यांना मिळाली होती. त्यानुसार शास्त्री नगर इथल्या अविवा हॉस्पिटलपाठी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं गेलं. कोर्टाने या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोघांची घेडली झडती
कृष्णा चौधरी आणि मुकेश टाकले या दोघांकडून पोलिसांनी प्रत्येकी एक किलो एमडी जप्त केले. कृष्णा चौधरी याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता तिथे पोलिसांना तब्बल साडे अकरा किलोंचे एमडी सापडला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेले ड्रग्स नेमके कुठून आले होते आणि कोणाला पुरवण्यात येणार होते याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.