मुंबई : अगदी देवाला ही न उलगडलेलं कोडं म्हणजे बाई. बाईचा स्वभाव देवालाही ओळखता आला नाही. तर आपण तर सामान्य माणूस आहोत. पण प्रत्येकालाच अनुभव असेल आपल्या घरातील आईला, बहिणीला, पत्नीला अगदी मुलीला देखील ओळखण कठिण आहे. त्यामुळे पत्नी हे प्रत्येकाच्या जीवनातील न उलगडणारं कोडं आहे. असं सगळं असताना सोशल मीडियावर बायकांचे 11 प्रकार व्हायरल होत आहेत. हे प्रकार पाहून तुम्ही सुरूवातीला खूप हसाल. पण याचा थोडा विचार केला तर लक्षात येईल की खरंच बायकांचा काहीसा स्वभाव असाच असतो. तर चला पाहूया बायकांचे 11 प्रकार….
बायकांचे ११ प्रकार पाहूया…


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. आळशी बायको :
स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा. प्रत्येकाला असं वाटतं की आपली बायको ही आळशी आहे.


२. धमकवणारी बायको :
कान खोलून ऐकून घ्या, या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.

३. इतिहासाची आवड असलेली बायको :
सर्व जाणून आहे मी, तुमचं खानदान कसं आहे ते.

४. भविष्य-वाचक बायको :
पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही.

५. गोंधळलेली बायको :
तूम्ही माणूस आहात की पायजमा?

६. स्वार्थी बायको :
ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे. तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही.

७. शंकाळू बायको :
फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?

८. अर्थशास्त्रज्ञ बायको:
कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?

९. धार्मिक बायको:
देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली.

१०. निराश बायको :
माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का?

११. टिकाऊ बायको  :
मी होते म्हणून टिकले, दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती. यातून तुमची कोणती आहे? तपासून घ्या!