मुंबई : देशातील सर्वात महत्त्वाची महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या एकूण 2352 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 1232 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 112 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य आणि घनकचरा विभागातील कर्मचारी सर्वाधिक संख्येने कोरोनाबाधित झाले आहेत. मुंबई महापालिकेचे एक उपायुक्त आणि एका सहाय्यक आयुक्तांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


मुंबईत कोरोनाचा सर्वाधित संसर्ग पाहायला मिळत आहे. रोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना महापालिका कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपली जबाबदारी बजावत आहेत. जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्माचारी, मुंबई पोलीस, महापालिका कर्मचारी काम करत आहेत.


मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये देखील कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. मुंबई पोलीस विभागाने देखील आपले अनेक अधिकारी आणि पोलीस गमवले आहेत.