मुंबई : अकरावी प्रवेश गोंधळ दूर करण्यासाठी उद्या दिवसभर वेबसाईट बंद राहणार आहे. दोन दिवस अर्ज करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे शिक्षण मंत्रालयाने उद्या  वेबसाईट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून २२ जूनला ऑनलाईन प्रवेश पुन्हा सुरु होणार, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकरावीची प्रवेशप्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी उद्याच्या दिवसात दूर करणार असून, परवापासून ऑनलाइन प्रवेश प्रकिया सुरळीत होईल, असेही विनोद तावडे म्हणाले आहेत. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


गणितात नापास म्हणजे आयुष्यात नापास असे होत नाही. गणिताला पर्यायी विषयच ठेवणार, असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. गणिताला पर्यायी विषय ठेवण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं आश्वासनंही तावडेंनी दिलं आहे. 


दरम्यान, कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नसते. त्यामुळे इयत्ता दहावीत हा विषय ऐच्छिक ठेवण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळाला सोमवारी केली होती.