मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Assembly Monsoon Session) पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे आशिष शेलार, अतुल भातखळकर, पराग आळवणी, जयकुमार रावल यांच्यासह 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. तालिका अध्यक्षांच्या दालनात 60 ते 70 भाजप आमदारांनी आपल्याला घेरून आपल्याला शिवीगाळ केली असं तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हटलं. या गोंधळी आमदारांना रोखण्याचं आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपण म्हटलं पण त्यांनी त्यांना रोखण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला असा आरोप जाधव यांनी केलाय. निलंबित आमदारांना या वर्षभरात मुंबई आणि नागपूर इथल्या अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.


या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन