राज्यातील २०१६ पासून बंद असलेली १५०० दारुची दुकानं सुरू होणार
विविध निर्बंधांमुळे ही दारुची दुकानं बंद होती
दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील २०१६ पासून बंद असलेली दारुची दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल वाढ, रोजगार उपलब्ध व्हावा आण अवैध दारू विक्रीला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
2016 पासून विविध निर्बंधांमुळे ही दारुची दुकानं बंद होती. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर निर्बंधामुळे राज्यातील 2200 दारुची दुकानं बंद होती. न्यायालयाने यात काही शिथिलता दिली. त्यानंतर राज्य सरकारनेही काही नियमावली तयार केली. या नियमावलीचा फायदा राज्यातील 2200 पैकी 1500 दारुच्या दुकानांना होणार आहे.
कोणत्या भागातील दारूची दुकानं सुरू होणार
- या नियमावलीनुसार पर्यटन स्थळे, एमएमआरडी, पीएमआरडीएसारखी क्षेत्रातील बंद असलेली दारू दुकानं सुरू करण्यास परवानगी.
- महापालिका हद्दीपासून ५ किलोमीटरच्या आत असलेली दुकानं
- नगरपालिका हद्दीपासून ३ किलोमीटरच्या आत असलेली दुकानं
- दीड हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावं