मुंबई : कडाक्याच्या थंडीत आज मुंबईकरांची उर्जा पहायला मिळाली ती १७व्या मुंबई मॅराथॉनमध्ये..आशियातील सर्वात मोठी आणि मानाचा 'गोल्ड लेबल' दर्जा मिळवणारी ही मुंबई मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पहाटे सव्वापाच वाजता सुरु झाली. देश-विदेशातील नामांकित धावपटूंसह उद्योग जगतातील नामी चेहरे, सिनेकलाकार यात सामिल झाले. विजेतेपदासाठी यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन टीमने 'बी बेटर' या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची 'टीएमएम २०२०'नं पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी स्पर्धेसाठी एकूण ५५ हजार ३२२ धावपटूंनी नोंदणी केली असून यापैकी पूर्ण मॅरेथॉनसाठी ९ हजार ६६० तर अर्ध मॅरेथॉनसाठी १५ हजार २६० धावपटू मैदानात उतरलेत.. त्याचसोबत ड्रीमरन साठी १९ हजार ७०७ धावपटू, सिनीअर सिटिझन विभागात १ हजार २२ धावपटू, चॅम्पिअन विथ डिसेबिलिटीमध्ये १ हजार ५९६ धावपटू, ओपन १०केमध्ये ८ हजार ३२ धावपटू तर पोलिस कपमध्ये ४५ संघ सहभागी झालेत. यंदाच्या स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धकांच्या बक्षीस रकमेत वाढ झाली नसली तरी एकूण स्पर्धेत ४ लाख २० हजार यूएस डॉलरची खैरात करण्यात आलीये. 



शिवाय वैद्यकीय स्टेशने, पाणी केंद्र, टेट्रापॅक, बेसकॅम्प, रिस्टोरेशन केंद्र आदी सुविधांची उत्तम बडदास्त ठेवण्यात आली आहे. मॅरेथॉनसाठी वाहतुकीच्या नियोजनबरोबरच मुंबई पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.