मुंबई बॉम्बस्फोट : सालेम, डोसासह सहा जण दोषी तर एकाची निर्दोष मुक्तता
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी आज टाडा कोर्टानं अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय तर एकाला निर्दोष सोडण्यात आलंय.
मुंबई : १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी आज टाडा कोर्टानं अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय तर एकाला निर्दोष सोडण्यात आलंय.
मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोज खान ताहेर मर्चंट, रियाझ सिद्दीकी आणि करीमुल्ला शेख अशी या दोषींची नावं आहेत. तर संजय दत्तच्या घरी हत्यारं पोहचवण्याचा आरोप असलेल्या अब्दुल कय्युम शेख याची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय.
अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यावर दहशतवादी कारवायांचा कट रचणे हत्या करणे, पुरावे नष्ट करणे असे गंभीर आरोप सिद्ध झालेत. येत्या १९ तारखेपासून शिक्षेच्या सुनावणीला सुरूवात होईल असं टाडा कोर्टानं म्हटलं.
मुंबईतल्या या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण १२९ आरोपी होते. त्यापैंकी १०० आरोपांनी टाडा न्यायालयानं दोषी ठरवून ६ महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. मुख्य सूत्रधार याकूब मेमनला फाशीची शिक्षा देण्यात आलीय. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनिस इब्राहिमसह एकूण २७ आरोपी अजून फरार आहेत.
काय होते आरोप...
अबू सलेम - पोर्तुगाल हून प्रत्यार्पण करण्यात आले असून, हत्यारे गोळा करणे, कटात सहभागी होणे, घातक शस्त्रसाठा बाळगणे, हत्या करणे, हत्येचा कट रचणे, मालमत्तेचे नुकसान करणे, संजय दत्तला हत्यारे देणे
मुस्तफा डोसा - दुबईहून मुस्तफा डोसाला अटक करण्यात आली होती. मुख्य सूत्रधार, दुबईत झालेल्या कटाच्या बैठकीत सक्रिय सहभाग, तरुणांना दहशतवादाच्या ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात पाठवणे, छुप्या मार्गाने घातक हत्यारे आणि स्फोटके मुंबईत आणणे, हत्यारे गोळा करणे, कटात सहभागी होणे, घातक शस्त्रसाठा बाळगणे, हत्या करणे, हत्येचा कट रचणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि हत्येस कारणीभूत होणे
फिरोज खान - मुख्य सूत्रधार, दुबईत झालेल्या कटाच्या बैठकीत सक्रिय सहभाग, छुप्या मार्गाने घातक हत्यारे आणि स्फोटके मुंबईत आणणे, त्यांची विविध ठिकाणी तस्करीचे करणे, हत्यारे गोळा करणे, कटात सहभागी होणे, घातक शस्त्रसाठा बाळगणे, हत्या करणे, हत्येचा कट रचणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि हत्येस कारणीभूत होणे.
ताहेर मर्चंट - पाकिस्तानात दहशतवादाचं ट्रेनिंग घेण्याकरता जाणा-या तरुणांना जाण्यासाठी मदत करणे, कटात सहभागी होणे, हत्येस कारणीभूत होणे, मालमत्तेचे नुकसान करणे
रियाज सिद्धीक्की - हत्यारांची तस्करी करण्याकरता वाहणांची सोय करणे, स्फोटकांची तस्करी करणे, आरडीएक्सची तस्करी करणे, रियाज सिद्दीकीने त्याच्या मारुती वॅन मधुन आरडीएक्स आणि गुजरात मधील भरुच येथे अबू सलेमकडे सोपवली होती.
करीमुल्ला शेख - मुख्य सूत्रधार, दुबईत झालेल्या कटाच्या बैठकीत सक्रिय सहभाग, छुप्या मार्गाने घातक हत्यारे आणि स्फोटके मुंबईत आणणे, त्यांची विविध ठिकाणी तस्करीचे करणे, हत्यारे गोळा करणे, कटात सहभागी होणे, घातक शस्त्रसाठा बाळगणे, हत्या करणे, हत्येचा कट रचणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि हत्येस कारणीभूत होणे