मुंबई : रक्षाबंधनच्या सणाला महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने प्रवाश्यांना मोठी भेट दिली आहे. २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान रक्षाबंधनाच्या निमित्ताने २००० जादा बस सेवा पुरवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या २६ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण असल्याने राज्य परिवहन महामंडळाने या २००० अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सणानिमित्त गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालाय. याबाबत महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने याची घोषणा आज केली.



एसटी महामंडळाकडून  सणानिमित्त प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रक्षाबंधन सणाच्या एक दिवस आधीपासून दुसऱ्या दिवसापर्यंत अशा तीन दिवसांसाठी अतिरिक्त २००० बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटीच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, या काळात प्रवाशांची गैरसोय होत नाही तसेच एसटीलाही अतिरिक्त महसूल उपलब्ध होतो, अशी माहिती देण्यात आली.