मुंबईत ड्रग्जचा मोठा साठा जप्त
मुंबई : नाशिकमधील एम डी ड्रग्ज प्रकरणात मुंबईत छापे टाकण्यात आलेत. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधून नदीम चोरडिया आणि नजमुल्ला शेख या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल ४४ लाखांचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २२०० ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आलयं.
यापूर्वी नाशिकमध्ये तीन जणांना अटक केली होती. यात तपास करताना मुंबईत खुलेआम व्यापार सुरू असल्याचं उघड झालंय.