राज्यात कोरोनाचे २२५९ नवे रुग्ण; दिवसभरात १२० जणांचा मृत्यू
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजार 787 इतकी झाली आहे.
मुंबई : मंगळवारी राज्यात 2259 नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. तर एका दिवसात राज्यात 120 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1663 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात आतापर्यंत 42 हजार 638 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या 44 हजार 849 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजार 787 इतकी झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 3289 जणांचा बळी गेला आहे.
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत आज 1015 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांनी संख्या 51 हजार 100वर गेली आहे. त्यापैकी 22 हजार 943 रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईत 1760 जण दगावले आहेत. मुंबईत सध्या 26 हजार 391 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुधारलं आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 46.96 टक्के इतका आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.6 टक्के आहे.
जग कोरोनाने त्रस्त; पण भारतीय 'या' गोष्टी सर्च करण्यात व्यस्त
ठाण्यात 14063, पालघर 1636, रायगड 1500, नाशिक 1660, जळगाव 1149, पुणे 10073, सोलापूर 1468, सातारा 658, सांगली 180, सिंधुदुर्ग 130, रत्नागिरी 378, औरंगाबादमध्ये 2085, नागपूरमध्ये 788, अकोला 848, धुळे 290 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
तर गडचिरोली 45, चंद्रपूर 42, गोंदिया 68, भंडारा 42, वर्धा 11, वाशिम 12, बीड 63, परभणी 78, बुलढाणा 97, यवतमाळमध्ये 164, नांदेड 171, जालन्यात 209, अमरावतीमध्ये 303 कोरोनाबाधित सापडले आहेत.
अनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
आरोग्य तज्ज्ञांचा दावा, 'या' महिन्यात येईल कोरोना संपुष्टात