नवी दिल्ली : गेल्या जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ भारतात कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. कोरोना काळात गुगलवर अनेक भारतीय कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात सर्च करत होते. मात्र आता भारतीयांकडून कोरोनाविषयीचं सर्च करण्याचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे. आता इंटरनेवर अगदी कमीत-कमी लोकांकडून कोरोनाविषयी गुगल सर्च करण्यात येतंय.
गुगल सर्च ट्रेड्सनुसार, (Google search trends) भारतीयांकडून कोरोनासंबंधी करण्यात येणारं गुगल सर्च एप्रिल महिन्याच्या तुलनेत, मे महिन्यात जवळपास अर्ध्यावर आलं आहे. ही सर्व आकडेवारी भारतातील लोकांच्या शोध परिणामांवर (Search results) आधारित आहे. भारतीयांकडून कोरोनाविषयीच गुगल सर्च कमी झालं असलं तरी क्रिकेट आणि इतर बाबतीतील सर्च मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. देशभरात कोरोना संसर्गाचे रुग्ण सतत वाढत आहेत. त्यामुळे क्रिकेटचे कोणतेच सामने होत नाहीयेत. सध्या क्रिकेटचे सामने होत नसल्याने भारतीयांकडून याचबाबतचं गुगल सर्च पाच टक्क्यांनी वाढलं आहे.
भारतात गेले कित्येक आठवडे सतत चर्चेत राहिल्यानंतर, देशभरातील कोरोना व्हायरसबाबत माहिती जाणून घेण्याची लोकांमधील इच्छा कमी होत असल्याचं दिसतं आहे.
मे महिन्यात गुगलवर, कोरोना व्हायरससंबंधी माहिती सर्च करण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. कोरोनाऐवजी आता लोक पुन्हा चित्रपट, गाणी-संगीत आणि हवामानाच्या माहितीबाबत अधिक सर्च करत आहेत.
मे महिन्यात सर्वाधिक लोकांनी 'लॉकडाऊन 4'बाबत गुगलवर सर्च केलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 'ईद मुबारक' याबाबत सर्च करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरससंबंधी करण्यात येणारं सर्च आता 12व्या स्थानावर पोहचलं आहे. तर चित्रपट, बातम्या, हवामान आणि इतर शब्दांचा अर्थ सर्च करणं 12व्या स्थानाच्या वर आहे.