मुंबई : पश्चिम रेल्वेवर २३ नव्या बम्बार्डियर लोकल सुरु करण्याच्या निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेने १५ जुन्या लोकल गाड्यांना आपल्या सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरही २३ नव्या बम्बार्डियर लोकल दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


नव्या लोकलची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्यात केली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. दरम्यान, रेल्वे प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून सिमेन्स कंपनीच्या नव्या लोकल दाखल केल्या जाणार आहेत.