वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट; आणखी एकाचा मृत्यू
वरळीत जवळपास 40 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
मुंबई : वरळीत कोरोनाचा धोका वाढतोच आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. 70 वर्षीय वृद्धाचा कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनामुळे तिसरा बळी गेला आहे. वरळी कोळीवाड्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 21वर पोहचली आहे. तर संपूर्ण वरळीत जवळपास 40 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
जी दक्षिण विभागात रुग्णांची संक्या 61वर गेली आहे. वरळी कोळीवाड्यानंतर जिजामातानगर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय. जिजामाता नगरमध्ये 16 कोरोना रुग्ण सापडले आहेत. या भागातील हाय रिक्स कॉन्टॅक्ट असलेल्या आजूबाजूच्या घरातील 170 जणांना पोद्दार रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलं आहे. जिजामाता नगर झोपडपट्टीमध्ये जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. वरळी, जिजामात नगर या संपूर्ण भागात पोलिसांचा मोठा पाहारा आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 690 वर पोहचली आहे. मुंबईत सर्वाधिक 406 कोरोना रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाचे 55 रुग्ण वाढले आहेत. मुंबईत 29, पुण्यात 17, अहमदनगर 3, औरंगाबादमध्ये 5 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत.