मुंबई : दिवाळीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे तर्फे यंदा ३८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते पाटणा-नागपूर, एलटीटी ते सावंतवाडी, साईनगर शिर्डी, थिविम आणि पुणे ते मनधुद या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे.


कोकण रेल्वे मार्गावर या गाड्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

०१०३७ एलटीटी-सावंतवाडी स्पेशल गाडी ५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी रात्री १.१० वाजता सुटणार असुन सावंतवाडीला त्याच दिवशी दुपारी १.२० वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१०३८ सावंतवाडी-एलटीटी स्पेशल गाडी ५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी दुपारी २.१० वाजता सुटणार असुन एलटीटी दुसऱ्या दिवशी रात्री १२.२० वाजता पोहचणार आहे. ०१०४५ एलटीटी-थिविम स्पेशल गाडी २ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता सुटणार असुन थिविमला त्याच दिवशी दुपारी १.५० वाजता पोहचणार आहे. 


नागपूर आणि शिर्डीसाठी गाड्या


तसेच  ०२०३१ सीएसएमटी -नागपूर स्पेशल ट्रेन ८-२२ नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री ११.५५ वाजता सुटणार असुन दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता  पोहचणार आहे. ०११३५ एलटीटी ते साईनगर शिर्डी स्पेशल  ट्रेन ८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री १२.४५ वाजता सुटणार असून त्याच दिवशी सकाळी ७.३० वाजता साईनगर शिर्डी येथे पोहचणार आहे.
०२०५३ सीएसएमटी ते पाटणा सुपरफास्ट ट्रेन २ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी दुपारी २.२० वाजता सुटणार आहेत