मुंबई : उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट लिहणाऱ्या हिरामणी तिवारी मुंडण प्रकरणात मुंबई पोलसिांनी चार शिवसैनिकांना अटक केलीय. सोमवार २३ डिसेंबर मुंबईतल्या वडाळा भागात राहणाऱ्या हिरामण तिवारी यांचं काही शिवसेना कार्यकर्त्यांकडून मुंडण करून त्यांना मारहाण करण्यात आली होती. हिरामण तिवारी यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारी पोस्ट लिहिली होती. यावर, मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याचा जाब विचारत शिवसेना कार्यकर्त्यांना कायदा आपल्या हातात घेतला होता. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाधान जुगधर, प्रकाश हसबे, श्रीकांत यादव आणि सत्यवान कोळंबेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. हिरामण तिवारी यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीविरोधात ट्रक टर्मिनस पोलिसांत तक्रार दाखल केली होती.  


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावर टीका करताना जामिया मिलिया घटनेची तुलना 'जालियनवाला बाग' हत्याकांडाशी केली होती. यावर हिरामण तिवारी यांनी फेसबुकवर उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा शिवसैनिकांनी आरोप केला.... आणि हिरामण तिवारी याला हुडकून काढत त्यांना मारहाण केली.