हिमवादळ : मुंबईचे 5 गिर्यारोहक उत्तराखंडमध्ये बेपत्ता
उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुंबईचे 5 गिर्यारोहक (Avalanche in Uttarakhand) बेपत्ता झाले आहेत.
मुंबई : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुंबईचे 5 गिर्यारोहक (Avalanche in Uttarakhand) बेपत्ता झाले आहेत. हिमवादळामुळे त्रिशुल शिखरावर (Mount Trishul) गिर्यारोहक बेपत्ता झाल्याची माहिती हाती आली आहे. उत्तराखंडमध्ये पुन्हा हिमवादळ झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली आहे. गिर्यारोहकांचा लष्कराकडून शोध घेण्यात येत आहे. (5 Mumbai climbers go missing in Uttarakhand)
उत्तराखंडमध्ये झालेल्या या हिमवादळात भारतीय नौदलाचे 10 जवान बेपत्ता झाले आहेत. सध्या त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हे 20 जवान गिर्यारोहण करण्यासाठी माऊंट त्रिशूलवर जात होते. मात्र शिखर चढत असताना हा अपघात झाला. ही 20 जणांची टीम 7,120 मीटर उंच माऊंट त्रिशूलवर गिर्यारोहणासाठी गेली होती.
कुमाऊंमधील बागेश्वर जिल्ह्यातील चमोली जिल्ह्याच्या सीमेवर माऊंट त्रिशूल आहे. त्रिशूल पर्वत शिखरावर जाण्याच्या प्रयत्नात असताना एका मोहीमेच्यावेळी हिमस्खलन झाल्याने पाच जण बेपत्ता झालेत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. हेलिकॉप्टर, लष्कर, हवाई दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि ग्राउंड रेस्क्यू टीम सध्या शोध मोहीम राबवत आहे.