मुंबई : मध्य रेल्वेने प्रवास करणारे ५० टक्के प्रवासी हे तणावग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. बदलती जीवनशैली, कौटुंबिक वाद, स्पर्धात्मक युग, प्रवासाचा ताण, नोकरीतलं कमी वेतन आणि कामाचा तणाव  यामुळे तणाव वाढत असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे.


रेल्वेतून प्रवास करणा-या प्रवाशांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी मध्य रेल्वे आणि मॅजिक ड्रील यांनी एक रुपयात आरोग्य तपासणीची सुविधा, मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात वन रूपी क्लिनिक नावानं सुरु करण्यायत आली आहे. या आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य तपासणीसाठी आलेल्या असंख्य प्रवाशांपैकी सुमारे ५० टक्के प्रवासी तणावग्रस्त असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.