मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू
चांदिवली परिसरात असलेल्या सहा मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे काही जण ढिगा-याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : चांदिवली परिसरात असलेल्या सहा मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर आणखीन काही जण ढिगा-याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे.
संघर्ष नगर परिसरात एका इमारतीचे पाडकाम सुरू होते त्यावेळी या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. इमारतीचा भाग कोसळल्याने ६ जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इमारतीचं पाडकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली. त्यामुळे ढिगा-याखाली २ जेसीबी मशिन्स गाडल्या गेल्याचं वृत्त समोर येत आहे.
इमारतीचा काही भाग कोसळल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.