BMC Tenders, मुंबई : लवकरच मुंबई शहरातील रस्ते(Roads) चकाचक होणार आहेत.  मुंबई महापालिकेने(BMC) पुन्हा एकदा काँक्रीट रस्त्यांसाठी 6079 कोटींचे टेंडर(tender) काढले आहे. या नव्या टेंडरनुसार खर्च 17 टक्क्यांनी वाढला आहे. रद्द केलेल्या मागील टेंडरच्या तुलनेत तब्बल नव्या टेंडरमध्ये तब्बल 17 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 280 कोटी रूपयांचा खर्च वाढला आहे. लवकरच मुंबईत रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे.  याआधीचे टेंडर रद्द करण्यात आले होते.  रद्द केलेल्या मागच्या टेंडरच्या तुलनेत नव्या टेंडरमध्ये तब्बल 17 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 280 कोटी रूपयांची वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यांसाठी परदेशात वापरल्या जाणा-या पोरस सिमेंट वापराची नव्याने अट या टेंडरमध्ये घालण्यात आली आहे.  मुंबईतील 400 किलोमीटरच्या सिमेंट क्राँकिट रस्त्यांसाठी हे टेंडर काढलेत. मागच्या वेळी मुंबई महापालिकेने 5 हजार 800 कोटींच्या निविदा मागवल्या होत्या. मात्र, या निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने निविदा रद्द करण्यात आल्या होत्या.


मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे 2 हजार किमीचे रस्ते आहेत.  यामधील सुमारे १ हजार किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णही झाले आहे. पालिकेने याआधी मागवलेल्या निविदा 2018 च्या दरांनुसार मागवल्या होत्या. मात्र आता चार वर्षांच्या कालावधीत सिमेंट, लोखंड, स्टील आणि इतर आवश्यक सर्वच सर्व कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे नव्या निविदा प्रक्रियेत याच रस्त्यांच्या कामाच्या कंत्राटाची रक्कम सुमारे 17 टक्क्यांनी वाढल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.