COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पावसाचे राज्यात गेल्या नऊ दिवसांत ६२ जणांचा बळी गेलाय. पावसामुळे विविध कारणांनी या ६२ जणांचा अंत झालाय. काहींचा बुडून तर काहींचा शॉक लागून मृत्यू झालाय. गेल्या आठवडाभरात मुंबईसह वसई-विरार आणि विदर्भाला पावसानं जोरदार तडाखा दिलाय. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं काहींचा मृत्यू झालाय. राज्याच्या अनेक भागात पावसानं मुक्काम केलाय. एकीकडे मुंबईला पावसानं झोडपून काढलं असताना लगतच्या ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस झालाय. कोकणात नेहमीप्रमाणे संततधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांना पूर आलाय.


पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गासह कोकणातली रस्ते वाहतूक संथ झालीये. दुसरीकडे विदर्भामध्येही पावसानं मुक्काम केलाय. यंदा प्रथमच पावसाळी अधिवेशन नागपूरात होत असताना सरकारच्या स्वागताला पाऊसही शहरात हजर झालाय. यवतमाळसह विदर्भातल्या अन्य जिल्ह्यांनाही पावसानं झोडपून काढलंय. पश्चिम महाराष्ट्रातही चांगला पाऊस झाला असली तरी उत्तर महाराष्ट्राकडे मात्र त्यानं अद्याप पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अड्चणीत सापडलाय. जूनच्या पाहिल्याच आठवड्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. मराठवाड्यालाही अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे.