मुंबई : देशात वाघांची संख्या वाढली आहे. २०१४ साली देशात फक्त २२६ वाघ होते. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. सध्या राज्यातले वाघ ३१२ आहेत. मोदींच्या भाषेत सांगायचं तर एक था टायगरपासून ते टायगर जिंदा है पर्यंतचा हा प्रवास. वाघांची ही संख्या वाढली ती नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे आणि वन्यजीव कार्यकर्त्यांमुळे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुचाकीवरुन 13 देशांचा प्रवास करत वाघ वाचवण्याचा संदेश देणारं कोलकाताचं दास दाम्पत्य सध्या नागपुरात पोहचलं आहे. जर्नी फॉर टायगर या अभियानाअंतर्गत त्यांनी आता तब्बल 21 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. 


राज्यात गेल्या पाच वर्षांत वाघांच्या संख्येत ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राचा क्रमांक मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड नंतर येतो.


काय करण्याची गरज?


१. प्रत्येक वाघाला रेडिओकॉलर लावायला हवी
२. वन कर्मचाऱ्यांच्या सगळ्या रिक्त जागा भरायला हव्यात
३. बफर क्षेत्राला लागून असलेल्या लोकवस्तीचं पुनर्वसन व्हायला हवं
४. पर्यटकांची संख्या मर्यादित हवी
५. तस्करीचं प्रमाण घटलं असलं तरी ते शून्य टक्के व्हायला हवं
६. अवनीसारखे मृत्यू टाळायला हवेत


व्याघ्र संवर्धनात देशानं आणि राज्यानं चांगला पल्ला गाठला आहे. तरीही वाघोबांच्या संवर्धनासाठी थोडा है थोडे की जरुरत है.